Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूरजवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

लातूरजवळ भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू

लातुर : बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे आज एका भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड गावाजवळ त्यांची फॉर्च्युनर कार पावसामुळे रस्त्यावरून घसरून दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. आर. टी. देशमुख हे सोलापूर येथून परळीकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र 361 वरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जातांना ४.१९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रस्ता ओला व निसरडा झाल्याने तसेच रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी स्लीप होवून सुरक्षा कठडा तोडून दुभाजकावर जोरात आदळली आणि चार वेळेस पलटी झाली. या अपघातात आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर चालकावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. 

अपघातात चालक, अंगरक्षक गंभीर जखमी

आरटी देशमुख यांच्यासोबत गाडीत त्यांचा अंगरक्षक आणि चालक होता. औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ गाडी स्लिप होऊन हा अपघात झाला. या अपघातात चालक आणि अंगरक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते.

जिजा म्हणून होते परिचित

जिजा म्हणून सर्वत्र परिचित असलेले आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये माजलगावामध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा देशमुख यांनी जवळपास ३७ हजार मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments