/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने नळदुर्ग येथील पत्रकार अयुब शेख सन्मानीत

Hot Posts

महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने नळदुर्ग येथील पत्रकार अयुब शेख सन्मानीत

महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने नळदुर्ग येथील पत्रकार अयुब शेख सन्मानीत.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ (दिनेश सलगरे):- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पुण्यातील पंचतारांकित जे डब्लू मरीयट हॉटेल मध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळ्यात धाराशिव डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अयुब शेख यांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पुण्यातील पंचतारांकित जे डब्लू मरीयट हॉटेल मध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्थे दि 25 मे रोजी पार पडला.

 'एन टीव्ही न्यूज मराठी'च्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. व तसेच जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी नेहमी पाठपुरावा करत असतात. अन्याय झालेल्या पत्रकारांना न्याय कसं देता येईल ते नेहमी प्रयत्न यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्थे करण्यात आले तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे होते.प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना जयकुमार गोरे,आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे महेश दादा लांडगे,खडकवासाला विधानसभेचे भिमराव तापकिर,मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके,पुणे कंटोमेन्ट विधानसभा आमदार सुनील कांबळे,चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप,आणि विधानसभा परिषद आमदार डॉ उषा खापरे एन टीव्ही चे संपादक इकबाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रास्ताविक मांडत सोहळ्याचे आयोजक तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेचे महत्व सांगत उपस्थित सर्व डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार बंधू भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी केवळ महाराष्ट्र राज्य न्हवे तर देशातील इतर राज्यातूनही संपादक व वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments