तुळजापूर तालुक्यातील होनाळा परिसरात वाघ सदृश्य प्राण्याचा वावर, वन विभागाकडून पाहणी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
तुळजापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: तालुक्यातील होनाळा शिवारात नागरिकांच्या नजरेला मंगळवारी (दि १७) वाघ दिसून आल्याच्या चर्चेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर येडशी बार्शी येथून वाघाने आपला मोर्चा तुळजापूर तालुक्याकडे वळविल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तात्काळ घटनास्थळी तुळजापूर वनविभागाच्या अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन यांनी परिसरात शोध घेतला. या पाहणीमध्ये वाघ सदृश्य प्राणी असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
तुळजापूर तालुक्यातील किलज, चिकुंद्रा , सलगरा दिवटी वडगाव देव, होनाळा या परिसरात मागील काही दिवसापासून वाघ सदृश्य प्राण्याचे पायाच्या ठसे आढळून आल्याने ग्रामस्थासन शेतकऱ्यांमध्ये भितीने वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरासह रेस्क्यू टीम द्वारे या हिंस्र प्राण्याला ट्रॅप करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मागील चार-पाच महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये बिबट्या वाघ यासारख्या हिंस्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून वनविभाग मात्र या प्राण्यांना पकडण्यात अपयशी ठरत आहे.
मागील तीन ते चार दिवसापासून सोशल मीडियाद्वारे वाघ सदृश प्राण्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यातच तुळजापूर तालुक्यातील होनाळा येथे शेतकरी राजकुमार टोम्पे हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांच्या गट क्रमांक ११६ मध्ये वाघ सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पाहणी केली असता हे जंगली हिंस्र प्राण्याचे पावलाचे ठसे असल्याचे सांगितले तसेच फोटो पडताळणीसाठी वरिष्ठांना पाठवले आहेत.
शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी व शक्यतो रात्री शेतामध्ये एकटे जाऊ नये अशा सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना वनपरिक्षेत्र कर्मचारी अभिमान शिरसागर यांनी शेतकऱ्याना, ग्रामस्थांना केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे जनावरे हे शेतातील गोठ्यातच असल्यास शेतकऱ्यांना झोपण्यासाठी शेतात जावं लागत त्यामुळे या हिंस्र जंगली प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी बांधवातून होत आहे.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली पहा
👇👇👇👇👇👇👇
0 Comments