डॉ वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा माने मुसळे हीस अखेर जामीन मंजूर,६६ दिवसांनी सुटका
सोलापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे: सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा महेश माने मुसळे हिला बुधवारी दि,२३ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी जामीन मंजूर अर्ज केला.न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मनीषा मुसळे माने यांना जामीन अर्ज मंजूर केला आहे. तब्बल 66 दिवसांनी मनीषा मुसळे माने यांची सुटका झाली.
या घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, 17 एप्रिल 2025 रोजी मनीषा माने हिने डॉक्टर शिरीष वळसंगकर ,उमावळ संकर व इतर दोघांना ई-मेल पाठवला होता. या ईमेलमध्ये मनीषा माने हिने डॉक्टरवर घाणेरडे आरोप केले होते त्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर हे व्यतीत झाले होते. त्यामुळे 18 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. व आत्महत्येस केल्याप्रकरणी मनीषा माने हीच जबाबदार आहे अशी आशियाची फिर्याद डॉक्टर वळसकर यांचे चिरंजीव अश्विन वळसनकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मनीषा माने हीच अटक केली होती न्यायालयाने मनीषा हीच पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती; त्यानंतर मनीषा माने हिने एडवोकेट प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी मनीषा हिच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले त्यानंतर दिनांक 23 जून रोजी मनीषा हिचा जामीन अर्जावर या सदर प्रकरणातील आरोपाप्रमाणे 17 एप्रिल रोजी पाठवलेल्या ई-मेलच्या प्रतीचे अवलोकन केले असता त्यामध्ये कोणतीही घाणेरडे आरोप केलेले नव्हते तो ईमेल एका कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी मालकाकडे केलेला होता.
या ईमेल मुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी अशी परिस्थिती नव्हती ई-मेल पाठवल्यानंतर मनीषाने माफीनामा दिला होता त्यानंतर तो विषय तिथेच संपला होता.या प्रकरणातील सुसायड नोट दुसऱ्या दिवशी जप्त करण्याचे दाखवण्यात आले वास्तविक मयताच्या अंगावरील कपडे त्याच दिवशी ताब्यात घेतली होती त्यामुळे सुसाईड नोट दुसऱ्या दिवशी सापडली ही बाब संशयास्पद दिसते.सुसाईड नोट मधील हस्ताक्षर मराठीतून असून दोषारोपत्रातील कागदाप्रमाणे 2001 नंतर डॉक्टरांनी मराठीत लिखाण केले नव्हते. यावरून सुसाईड नोट ही बनावट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अपहाराबाबतचे आरोप हे जुलै 2024 पूर्वीचे असून त्याचा डॉक्टरांच्या आत्महतेशी संबंध दिसून येत नाही दोषारोपत्रातील एकूण 44 साक्षीदार हे दवाखान्यातील कर्मचारी आहेत त्यामुळे त्यांच्या जबाबाचे अवलोकन केले असता मनीषा च्या वागणुकीबद्दल तक्रारी दिसतात त्यांचा देखील संबंध आत्महत्येची दिसून येत नाही.दोषारोपत्राची सी डी आर दाखल नाहीत दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी सीसीटीव्ही फुटेज जप्त नाहीत यावरूनच कोणालातरी वाचवण्यासाठी मनीषा हीच बळीचा बकरा करण्यात आला असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने Adv. प्रशांत नवगिरे यांनी केला.यात आरोपी मनीषा माने हिच्या वतीने adv. प्रशांत नवगिरे Adv. श्रीपाद देशक adv. सिध्दाराम पाटील तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील Adv. प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिले.
0 Comments