/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तामलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान शिबिराचे आयोजन , महसूल विभागाकडून शिबिरात नागरिकांस सहभागी होण्याचे आवाहन

Hot Posts

तामलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान शिबिराचे आयोजन , महसूल विभागाकडून शिबिरात नागरिकांस सहभागी होण्याचे आवाहन

तामलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  अभियान शिबिराचे आयोजन , महसूल विभागाकडून शिबिरात नागरिकांस सहभागी होण्याचे आवाहन


 तुळजापूर /प्रतिनिधी रूपेश डोलारे: मंडळ विभाग तामलवाडी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांना आवाहन केले जाते की महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय तुळजापूर यांच्यावतीने दिनांक 23/ 6/ 2025 रोजी तामलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आयोजित केले आहे .सदर शिबिर तामलवाडी येथे सरस्वती मंगल कार्यालय येथे सोलापूर धुळे हायवे लगत या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आहे.

या शिबिर अंतर्गत शेतकरी विद्यार्थी व महिला यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप उद्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व इतर महसूल विभागाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र  वाटप करणे, agristac ,pm kisan  तसेच प्रमाणपत्र बाबतच्या तक्रारी निकाली काढल्या जाणार आहेत. तसेच  दिव्यांग व निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे श्रावण बाळ योजनेतील पात्र व्यक्तींना श्रावणबाळ योजनेचा लाभ देणे तसेच या योजनेअनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. तसेच भटक्या व विमुक्त  जातीतील व्यक्तींना उत्पन्न दाखला रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड जात प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरास उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा. शिबिरास येताना सगायो व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक पासबुक व आधारशी लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन यावे. सदर शिबिरास माननीय तहसीलदार तुळजापूर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकास सदर शिबिरास उपस्थित राहून विधी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागाकडून केले आहे.

Post a Comment

0 Comments