Pune Gangster Shahrukh Encounter at Solapur :
सोलापुर: मोहोळ तालुक्यातील लांबोटी (पुणे) येथे शनिवारी रात्री पुणे क्राइम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) ठार झाला. शेखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ पोलिस ठाण्यांत १५ गंभीर गुन्हे दाखल होते. मकोका अंतर्गत कारवाई झालेला शेख फरार होता.पुणे क्राइम ब्रांचला शेख लांबोटी येथे नातेवाइकांकडे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच शेखने पिस्तूलातून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेख जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची चौकशी सुरू आहे.
पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल
दरम्यान, पुणे पोलिसांनी खात्मा केलेल्या शाहरुखवर अनेक गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुंड होता. शाहरुखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याचा मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. यावेळी पोलिसांनी लपलेल्या घरात छापेमारी केली. छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. यानंतर गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
0 Comments