उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील शेत रस्त्याची दुरावस्था; चिखलातून शेतकऱ्यांना काढावा लागतो मार्ग
नाईचाकुर प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथील अंबुलगा शिवरस्ता ,हाडोळी शिवरस्त्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून यामुळे शेतकरी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या भागातील शेतकरी शेताकडे चिखलात जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्र शासन पानंदमुक्त गाव योजना फक्त कागदावरच आहे का असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढून शेताकडे जावे लागत आहे. शासन शेतरस्त्याची दुरुस्ती तसेच रस्ता निर्मिती करण्याबाबत विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपये निधी मिळतो. तर दुसरीकडे पावसाळ्यात तालुक्यातील नाई चाकूर येथील शेत रस्ते चिखलमय झाले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चिखल तुडवत शेतात जावे लागते. बिकट अवस्थेत असलेल्या शेत रस्त्यांमुळे संबंधित यंत्रणेबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शेतापर्यंत बैलगाडी किंवा वाहन घेऊन जाणे दुरापास्त झाले आहे. शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन जायचे असल्यास चिखलातून मार्ग काढत अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बहुतांश शेतरस्त्यात पाणी साचल्याने रस्त्याचे गटारीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नाईचाकूर ते अंबुलगा रस्त्यावर अनेक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना आठ महिने चिखलातून शेताकडे जावे लागते.या दलित बांधवांनी आमदार खासदार ग्रामपंचायत व इतर प्रशासनांना वारंवार निवेदन दिले तर त्याचा काहीच फायदा झाला नाही गावामध्ये घरापुढे सिमेंटचा पक्का रस्ता प्रशासन करत आहे पण त्याच दलित बांधवांना शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही पूर्वीच्या काळी कोरडवाहू शेती होती पण आता सर्वजण शेतामध्ये बोर विहीर साह्याने शेतात पाणी केले पिकाला पाणी देण्यासाठी रात्री केव्हाही लाईट आली तरी अंधारा शेताकडे जाताना बाईक घेऊन जावे म्हणले तर शेताकडे पक्का रस्ता नाही त्यामुळे चालत गुडघ्यावर पाण्यात चिखलात काट्या-कुठ्यात शेताकडे जावे लागते विशेष म्हणजे नाईचाकूर ग्रामपंचायत आजपर्यंत झालेल्या सरपंचापैकी 80% सरपंच हे हाडोळी रस्ता व अंबुलगा रस्त्याच्या परिसरात त्यांचे शेत आहे आहेत आज पर्यंत आपल्या शेताला जाण्यासाठी पक्का रस्ता करू शकले नाहीत हाडोळी व अंबुलगा रस्त्याने जाणारे सरपंच शेषराव पवार, गोविंदराव पवार केशवदाजी पवार, केशव नागनाथ पवार भारतबाई सोनकांबळे चालू सरपंच चंद्रकांत स्वामी त्याचबरोबर जिल्हा परिषद दोन सभापती पण ह्याच रस्त्याने त्यांना शेताकडे जावे लागते.
आज पर्यंत नाई चाकूर चार पंचायत समिती सदस्य झाले आहेत त्यापैकी तीन सदस्यांना शेताकडे जाण्यासाठी चिखलात पाण्यातूनच जातात सोनाबाई पवार ,किसन कांबळे ,जयश्री पवार या सर्वांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता करावासा वाटला नाही का गोरगरीब शेतकरी दररोज शेताकडे जातात सरपंच जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समिती सदस्य गाव पुढारी सट्टिसहा महिन्याला शेताकडे जातात त्यांना काही त्रास होत नाही दररोज जाणाऱ्या शेतकरी बांधवांना जो त्रास होत आहे त्यांना लवकरात लवकर पक्का रस्ता करून शेताकडे जाण्यासाठी सहकार्य करावे
बाबुराव कांबळे
शेतकरी नाई चाकूर
माझे शेत नाईचाकुर अंबुलगा जाणाऱ्या पानंद रस्त्याच्या साईडला येत आहे मी आज पर्यंत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना बऱ्याच वेळेस निवेदन दिले आहे आम्हा शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करा असे मी निवेदन दिले आहे पण झाला नाही ग्रामपंचायत आम्हा दलित वस्तीला पक्का रोड करण्यासाठी दलित त्यांचे घर आहेत म्हणून पक्का रस्ता करत आहेत ती चांगली गोष्ट आहे शेताकडे जाणाऱ्या शेत रस्त्याला महार माळ म्हणून नाव आहे त्या महारमाळाला जाण्यासाठी आपण पक्का रस्ता करावा दलितांना न्याय द्यावा व इतर शेतकऱ्यांना पण न्याय द्यावा लवकरात लवकर शेत रस्ता करावा विनंती करत आहे
भाऊराव कांबळे
ज्येष्ठ शेतकरी नाईचाकूर
मी नाईचाकूरच्या प्रथम सरपंचाच्या निवडणुकीपासून मतदान करत आहे मी गावातील सर्व सरपंचांना वारंवार निवडणूक झाल्यानंतर विनंती करतो की आम्हा जाणारा दलितांच्या शेतकऱ्यांकडे रस्ता नाही तो रस्ता पक्का करून द्या व आम्हा शेतकऱ्यांना काट्याकुट्यातून चिखलातून पाण्यातून शेताकडे जावे लागते सरकार मोठा गाजावाजा करून पानंद मुक्त गाव योजना राबवत आहे पण नाईचाकूर येथील दलितांच्या शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना पक्का रस्ता करून द्यावा खरीपाला निघणारे पीक सोयाबीन उडीद मूग उन्हाळ्यातच राशी करतो शेतकऱ्याची नुकसान होते शेताकडे जाण्यासाठी वाट नसल्यामुळे मळणी यंत्र शेताकडे येतच नाही पूर्वी आम्ही उडीद बडवून डोक्यावर घराकडे घेऊन येत होतो पण आमचा जमाना गेला आता कोण शेताकडे भाकरीच टोपलं पण शेताकडे डोक्यावर घेऊन जात नाही मळणी यंत्राच्या साह्यानेच रास केली जाते त्यामुळे आम्ही उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यातच आमच्या शेतातील राशी करतो प्रशासनांना विनंती आहे आम्हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.
0 Comments