परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार, धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे : पश्चिम बंगाल येथुन पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या एका अल्पवयीन मुलीस फुस लावत तिला गुंगीचे औषध देऊन धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकाराचे अश्लील व्हिडिओ तयार केले तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्हा युवा उपाध्यक्ष अन्य दोघांना आरोपी केले असून यापैकी एकाला अटक केली आहे तर सत्ता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष एक जण फरार आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पश्चिम बंगाल येथून मुरुड तालुका लातूर येथे रोजी रोटी साठी आलेल्या एका दांपत्याच्या अल्पवयीन मुलीला येथील योगेश राठोड या तरुणाने फुस लावून गुंगीचे औषध देत तिच्यावर मुरुड ढोकी रस्त्यावरील राधिका बार व लॉज मध्ये बलात्कार केला होता आरोपीने यावेळी पीडित अल्पवयीन मुलीसह तिचे अशलील व्हिडिओ केले होते तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करतो असे म्हणून त्या आरोपीने तिच्यावर विविध ठिकाणी बोलावून लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी या मुलीने विरोध केल्यानंतर सदर व्हिडिओ त्या मुलीच्या वडिलांना पाठवण्यात आले यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठून सदर आरोपीच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणात मुरुड पोलीस ठाण्यात बुधवारी दिनांक 23 रोजी योगेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत हे करत आहेत सदर पिडीतिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास केला हा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरील काही राजकीय पुढाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते; तथापि उपविभागीय अधिकारी सुरेश कुमार राऊत यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास केला मुख्य आरोपी सहकार्य करणाऱ्या त्याचा मित्र व फोटोग्राफर यालाही पोलिसांनी अटक केली.अटकेतील आरोपींना पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
0 Comments