Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हरित धाराशिव अभियानांतर्गत वृक्षदिंडी

तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये हरित धाराशिव अभियानांतर्गत वृक्षदिंडी


तुळजापूर /प्रतिनिधी रुपेश डोलारे:  धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून 'हरित धाराशिव अभियान ' या अभियानातंर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी येथे वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले .त्यानिमित्त श्रीमती जे.जे.नाईक मॅडम विस्ताराधिकारी पंचायत समिती तुळजापूर,श्रीमती गायकवाड मॅडम कृषी सहाय्यक , श्री.राहुल जोगदंड तलाठी ,श्री.समाधान मार्तंडे ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य श्री. ज्ञानेश्वर शिंदे, श्री . ज्ञानेश्वर कदम वॉटरशेड संस्थेचे इंजिनिअर श्री.घायाळ साहेब ,सूर्यवंशी साहेब तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झाडे लावा झाडे जगवा ' अशा घोषणा मुलांनी दिल्या . आणि उत्साहात वृक्षदिंडी पार पडली.



यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राहुल थोडसरे सर तसेच सहशिक्षिका श्रीमती भुतेकर मॅडम तसेच अंगणवाडी कार्यकर्ती सौ.स्नेहा कदम यांचे सहकार्य लाभले.



Post a Comment

0 Comments