धाराशिव : १४ घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात .
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्ह्यातील घरपोडीच्या गुन्हातील मुरूम, लोहारा ,नळदुर्ग, तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 14 घरफोडीच्या गुन्हातील आरोपीस पोलिसांनी अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की ,18/07/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथक पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे लोहरा गु. र.नं.12/2025 क. 331(4) 305(a) भान्यास या गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे धर्मेंद्र ऊर्फ काळया विलास भोसले वय 23 वर्ष रा. शिंदगाव ता तुळजापूर हा. मु. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव हा धाराशिव शहरात आहे. अशी बातमी मिळाल्यावर त्यास पथकाने सीताफिने ताब्यात घेऊन त्याच्या कडे जिल्ह्यातील घरपोडीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने पोस्टे मुरूम, लोहारा ,नळदुर्ग, तुळजापूर च्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यावरून धाराशिव जिल्हा पोलीस गुन्हे अभिलेख तपासले असता त्याचे कडून एकूण घरपोडीचे 14 गुन्हे उघडकीस आले नमूद गुन्ह्या तील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या वाट्याला आलेला चोरीचा मुद्देमाल हा त्याने एका सोनारास सदरचे दागिने त्याच्या पत्नीचे आहेत असे सांगून विकले असल्याचे सांगितले. नमूद सोनाराकडून एकूण 70 ग्रॅम सोन्याची लगड किंमत 6,30,000 रुपये चा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे लोहारा येथे पुढील कारवाई कामे हजर केले आहे .
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक- सुदर्शन कासार, पोलीस हावलदार- शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फराहान पठाण,महिला पोलीस हावलदार- शैला टेळे,पोलीस नाईक- अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार- नितीन भोसले, रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments