घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा, विवाहतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Hot Posts

6/recent/ticker-posts

घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा, विवाहतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल

घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा, विवाहतेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे :घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन ये म्हणत मागील सहा महिन्यापासून पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक जाचास कंटाळून विवाहतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना 30 जुलै रोजी वाशी (washi)तालुक्यातील तेरखेडा शिवारात घडली असून या प्रकरणी पतीविरूध्द येरमाळा पोलीस स्टेशन(Yermala Police Station)  मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रवी आनंद कुसंगवाड वय 29 (रा खरफोडी रोड जालना) यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की शीला राजेंद्र वाघमारे वय 33 वर्षे राहणार तेडखेडा तालुका वाशी यांना मागील सहा महिन्यापासून पती राजेंद्र कल्याण वाघमारे यांनी घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरून पैसे आण असे म्हणत तगादा लावला होता. याच कारणावरून पती राजेंद्र वाघमारे यांच्याकडून होत असलेल्या सततच्या जाचास कंटाळून शिला वाघमारे यांनी दिनांक 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता यांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यानुसार पती राजेंद्र वाघमारे यांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 108, 80, आणि 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments