आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा नगिनाताई कांबळे व उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर यांची समाजसेवा पुरस्करासाठी निवड

Hot Posts

6/recent/ticker-posts

आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा नगिनाताई कांबळे व उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर यांची समाजसेवा पुरस्करासाठी निवड

आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा नगिनाताई कांबळे व उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर  यांची समाजसेवा पुरस्करासाठी निवड


---------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे काटगाव येथील आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा नगीनाताई कांबळे व आधुनिक लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते तथा केशेगाव येथील उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर  यांची आदर्श समाजसेवा पुरस्कारासाठी  निवड करण्यात आली असून शनिवार दि.९ ऑगस्ट रोजी मौजे इटकळ येथील साई मंगल कार्यालय येथील आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. आधुनिक लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून अध्यक्षा नगिनाताई कांबळे व राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षिरसागर यांनी गेल्या २० वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असुन आरक्षणा पासुन वंचित असणाऱ्या मातंग समाजाला आरक्षणाच उपवर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहेत समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक मोर्चात आंदोलनात सहभागी होऊन अनेक वेळा तुरुंगवास ही भोगावा लागला त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव व संभव प्रतिष्ठाण केशेगाव ता.तुळजापूर च्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरिय आदर्श समाजसेवा पुरस्कार-२o२५ साठी निवड करण्यात आलेली आहे.सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याचे रितसर पत्र संस्थेचे संस्थापक दयानंद काळूंके व तुकाराम क्षिरसागर यांनी दिले आहे. सदर पुरस्कारासाठी नगिना ताई कांबळे व लक्ष्मण क्षिरसागर यांची निवड झाल्याबदल त्यांचे गाव परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments