लातूर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत राखीव व्यक्तीचा ५ टक्के निधी व्यक्तींना वाटप करण्यात यावे,दिव्यांग सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत राखीव व्यक्तीचा ५ टक्के निधी व्यक्तींना वाटप करण्यात यावे,दिव्यांग सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

लातूर तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत राखीव व्यक्तीचा ५ टक्के निधी व्यक्तींना वाटप करण्यात यावे,दिव्यांग  जनशक्ती सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


लातूर : लातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये राखीव दिव्यांग व्यक्ती साठी पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही. यासाठी दिव्यांचा शक्ती सामाजिक संघटनेने संस्थापक अध्यक्ष किसन यादव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 24 नोव्हेंबर 2015 रोजी च्या शासन निर्णयामध्ये दिव्य वृत्तीवर पाच टक्के निधी खर्च करण्यात यावा अशी तरतूद असून सुद्धा या शासन निर्णयाप्रमाणे लातूर तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी अपंगासाठी 5% राज्य अपंगांना सन 2020 पासून ते आजपर्यंत कधीही वाटप केलेले नाही हा लातूर तालुक्यातील अपंग व्यक्तींचा लातूर तालुक्यातील प्रशासनावर रोष आहे.

तरी माननीय साहेबांनी सहानुभूतीपूर्वक विचार अपंग व्यक्तींना निवेदन दिलेल्या तारखेपासून ते एक महिन्यात सर्व लातूर तालुक्यातील स्थानिक अपंगाचा पाच टक्के निधी अपंगांना वाटप करण्यात यावा अन्यथा आणि संघटनेच्या वतीने दिनांक 20 /08/ 2025 पासून पंचायत समिती लातूर मेन रोडवर आम्ही अपंग शेकडोच्या संख्येने उपोषणाला बसणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

माहितीस्तव या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर माननीय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद लातूर माननीय उपविभागीय कार्यकारी जिल्हा परिषद पंचायत विभाग लातूर माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांना देण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments