धाराशिव जिल्ह्यातील शाळांना आज २७ सप्टेंबर सुट्टी जाहीर; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट धाराशिव शिक्षण विभागाचा निर्णय-Dharashiv Today All School Holiday News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील शाळांना आज २७ सप्टेंबर सुट्टी जाहीर; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट धाराशिव शिक्षण विभागाचा निर्णय-Dharashiv Today All School Holiday News

धाराशिव जिल्ह्यातील शाळांना आज २७ सप्टेंबर सुट्टी जाहीर; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट धाराशिव शिक्षण विभागाचा निर्णय-


धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे:  जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार जिल्ह्यातील सर्व शाळांना(School Holiday)  आज शनिवारी दि,२७ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असा निर्णय धाराशिव शिक्षण(Dharashiv)  विभागाने घेतला आहे.

याबाबत संबंधित शिक्षण विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हवामान विभागाकडून(Weather Department) दिनांक २७/०९ /२०२५ रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव (Zila parishad Dharashiv)यांच्या सूचनेनुसार दिनांक २७/०९/२०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या/सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.सदरहू आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात यावे. हवामान विभागाकडून धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा(Rain Alert)  इशारा दिल्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments