तुळजापूर शहरातील बस स्थानकातील स्वच्छता सफाई कामगारांना ठेकेदाराकडून मिळणाऱ्या अपुरे वेतन बाबत इंटक काँग्रेस धाराशिव यांचे तुळजापूर आगार प्रमुखांना निवेदन
तुळजापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर शहरातील दोन्ही बस स्थानकातील स्वच्छता कामगारांना ठेकेदाराकडून अपुरे वेतन मिळत असल्याने राष्ट्रीय मजदूर संघटना(National Trade Union) यांच्यावतीने माननीय आगार प्रमुख तुळजापूर यांना निवेदन देऊन वेतन वाढीची मागणी करण्यात आली आहे वेतन वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील दोन्ही बसस्थानकात सफाई कामगार स्वच्छतेसाठी काम करतात. यातील काही कर्मचारी महामंडळातर्फे नेमण्यात आले आहेत. तर काही कर्मचारी ठेकेदार मार्फत नेमण्यात आले आहेत .यात महामंडळातर्फे नेमण्यात आलेल्या सफाई कामगारांना प्रतिदिन तीनशे रुपये रोजगार दिला जातो तर ठेकेदारांमार्फत नेमलेल्या सफाई स्वच्छता कामगारांना फक्त प्रतिदिन दोनशे रुपये एवढाच रोजगार दिला जातो. मासिक प्रत्येकी नऊ हजार व सहा हजार याप्रमाणे वेतन दिले जाते. नियमाप्रमाणे महामंडळ स्वच्छता कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये प्रतिमहा देते तर मग ठेकेदार सहा हजार रुपये का देतो ? तरी संबंधित ठेकेदाराने या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रतिमा नऊ हजार रुपये एवढे वेतन द्यावे, अन्यथा धाराशिव जिल्हा इंटक तर्फे तुळजापूर आगारासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे. तरी याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मधुकर बबनराव शेळके जिल्हाध्यक्ष इंटक धाराशिव. जिल्हा उपाध्यक्ष विकास हावळे काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण यादव, इंटक धाराशिव. सचिव या निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


0 Comments