दुर्दैवी घटना : म्हैस चारण्यासाठी गेलेल्या पशुपालकाचा नदीत बुडून मृत्यू लोहारा तालुक्यातील घटना
धाराशिव / प्रतिनिधी रुपेश डोलारे: म्हैस करण्यासाठी गेलेल्या पशुपालकाचा तेरणा नदीत बुडून मृत्यू झाला ही दुर्घटना लोहारा तालुक्यातील नागुर शिवारात रविवारी दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोहारा तालुक्यातील नागुर येथील रहिवासी बालाजी त्र्यंबक मोरे वय 42 ही नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता स्वतःची म्हैस करण्यासाठी निम्न तेरणा नदीच्या पात्रा शेजारी गेली होती म्हैस चारुन घरी आली परंतु बालाजी मोरे हे घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांचे भाऊ धनाजी मोरे व ग्रामस्थ यांनी नदीपात्राकडे जाऊन शोधा शोध सुरू केली या घटनेची माहिती ग्रामस्थांनी लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कोकलारे यांना दिली तहसीलदार कोळेकर यांनी नायब तहसीलदार नाना मोरे मंडळाधिकारी बाळासाहेब बंडाळे लिपिक वजीर अत्तार, तलाठी यु.व्ही. उस्तुरे यांना तर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कोकलारे यांनी कानेगावची बीट अंमलदार अर्जुन तिघाडे ज्योतीराम भोजने, निरांजन फुल माळी यांना घटनास्थळी पाठवली यावेळी बेशरमच्या झाडाच्या जवळ पाण्यात बालाजी यांचा मृतदेह आढळला लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली त्यानंतर नागुर येथे मयताच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आली बालाजी मोरे यांच्या पश्चात आई दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

0 Comments