Breaking News : सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूर पुणे - महामार्गावरील वाहतूक ठप्प -Solapur Pune National Highway

Hot Posts

6/recent/ticker-posts

Breaking News : सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूर पुणे - महामार्गावरील वाहतूक ठप्प -Solapur Pune National Highway

Breaking News : सीना नदीला पूर आल्यामुळे सोलापूर पुणे - महामार्गावरील वाहतूक ठप्प -


सोलापूर/प्रतिनिधी/रूपेश डोलारे :  धाराशिव आणि सोलापूर(Solapur)  जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय. पाच ते सात दशकात पहिल्यांदाच सीना नदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद(Roads block) करण्यात आले आहेत. सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्गही पूरामुळे बंद करण्यात आला आहे. पुण्याहून सोलापूरच्या (Pune-solapur)दिशेने जाणारी वाहतूक लांबोटी(Lanboti) येथे एका बाजूने वळवण्यात आलीय. त्यामुळे पुलावर वाहणांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय बार्शी-कुर्डूवाडी(Barshi -kurdwadi) या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सोलापूर-पुणे महामार्गा (Solapur-pune National Highway)रात्री १० वाजल्यापासून बंद आहे.

मागील चार दिवसांपासून सोलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात कोळेगाव(Kolegaov dam) येथील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे सीना नदीचा (Seena Nadi)प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक पूल पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीमुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे शेताला(Rains effct Agree) नदीचे स्वरूप आलेय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. त्यात आता महामार्गही ठप्प झालाय.

सीना नदी पात्राची पाणी पातळी वाढल्याने सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाला आहे. लांबोटी पूल परिसरात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. रात्री १० वाजल्यापासून लांबोटी पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबावण्यात आल्याने वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लांबोटी परिसरातील सर्व हॉटेल्स ही बंद असल्याने प्रवाशांचे हाल होतायेत. मात्र खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय. आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लांबोटी पुलावरून पाहाणी करणार आहेत. त्यामुळे ही वाहतूक नेमकी कधी पूर्ववत होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments