लातूर जिल्ह्यातील बोरवटीत भूकंपाचे धक्के नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन-
लातूर /प्रतिनिधी रूपेश डोलारे : लातूर जिल्ह्याच्या मौजे बोरवटी गावात आज (शुक्रवार,26 सप्टेंबर,) रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake)सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक जमिनीला हालचाल जाणवल्याने नागरिक त्वरित घराबाहेर आले.
स्थानिक प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांच्याकडे चौकशी केली. भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात(Latur District) 2.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नोंदवण्यात आला आहे.सदरील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या मनामध्ये 1993 च्या किल्लारी (Killari)येथील भूकंपाची आठवण जागी झाली असून पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील मुरुड अकोला तसेच बडूर वस्तुरी या भागात सौम्य भूकंपाची धक्के नोंदवली गेली आहेत. त्या पाठोपाठ आज बोरवटी गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निलंगा तालुक्यातील उस्तुरी परिसरात मागील दोन दिवसापूर्वी भूकंपाची सौम्य धक्के
मागील दोन दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील उस्तुरी, बडूर , हरीजवळगा, कासार शिरशी या भागात दि,24 रोजी राञी 9.23 वाजेच्या सुमारास भूकंपाची सौम्य धक्के जाणवले होते. यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली होती.लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. २. ४ रिश्टल स्केल तिव्रतेच्या भकंपाची नोंद करण्यात आली आहे. कलबुर्गी, सोलापूर, नांदेड, आणि लातूर या ठिकाणच्या भुकंप मापक यंत्रावर तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर २.४ रिश्टर स्केल या सौम्य भुकंपाची नोंद आढळून आली.
या घटनेच्या एक दिवस अगोदर मुरुड अकोला गावात भूकंपाचा धक्के
दरम्यान या घटनेच्या एक दिवसाआधीच लातुरमधील मुरुड अकोला गावातही २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के बसले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी भुकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मात्र देन्ही भुकंपाचे धक्के सौम्य असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
घाबरून न जाता सतर्क राहा प्रशासनाचे आव्हान
तज्ज्ञांनी हा धक्का अत्यंत सौम्य स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरीही भूकंपाचा जुना इतिहास असलेल्या लातूर जिल्ह्यात, विशेषत: 1993 च्या विध्वंसक भूकंपानंतर, अशा घटनेनंतर नागरिकांमध्ये तातडीने भीतीचे वातावरण निर्माण होते.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने बोरवटी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.

0 Comments