महाराष्ट्रातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी इंद्रजीत साळुंखे व बाळासाहेब भोसले यांची तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
तुळजापूर प्रतिनिधी / रुपेश डोलारे : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत इंद्रजीत साळुंखे व बाळासाहेब भोसले यांची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील बीड, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर तसेच इतर भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाचे मोठ्या प्रमाणात न भरून येणारे असे शेतातील उभी पिके तसेच शेतातील माती वाहून गेल्यामुळे तसेच राहते घर पाण्यात बुडाल्या मुळे संसाराची अक्षरशा वाताहत झाली आहे.
आणि हे सर्व आई तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त आहेत. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून सकल विश्वाची जगन्माता आहे . हजारो वर्षांपासून हे सर्व भाविक आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या कडून फुल ना फुलाची पाकळी स्वरुपात अर्थ सहाय्य मंदिराला झाले आहे. आता सध्या हे भाविक मोठ्या आस्मानी संकटात सापडले आहेत.
तरी अशा कठीण परिस्थितीत आपण मंदिर संस्थानच्या वतीने त्या अतिवृष्टी ग्रस्त भाविकांना आई तुळजाभवानी चा आशिर्वाद म्हणून आर्थिक मदत व जीवन उपयोगी साहित्याचे किट देऊन त्यांना मदत करावी ही नम्र विनंती. या निवेदनावर गोपाळ पवार ओम साळुंखे यांच्या स्वाक्षरी आहेत.


0 Comments