देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाच्या कारवर चोरट्याचा डल्ला दोन लाखाचा ऐवज लंपास; धाराशिव -तुळजापूर मार्गावरील -
प्रातिनिधिक फोटो
धाराशिव प्रतिनिधी रुपेश डोलारे: तुळजापूर ते धाराशिव मार्गावर बावी येथील आश्रम शाळेजवळ श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारमधून चोरट्याने दागिणे व रोख रक्कम असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना दिनांक 13 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. नैसर्गिक विधीसाठी सदरील कार महामार्गाच्या कडेला उभी करून भाविक उतरले असताना ही घटना घडली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अशोक अर्जुन खरात वय (51) राहणार विजयपूर कर्नाटक हे आपल्या कुटुंबासह कारने क्रमांक KA- 28 2006 धाराशिव येथून तुळजापूरला श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात होते त्यांची कार सोमवारी पहाटेच्या सुमारास धाराशिव ते तुळजापूर मार्गावरील बावी येथील आश्रम शाळे जवळील पुलाजवळल येऊन पोहोचली असता त्यांनी नैसर्गिक विधीसाठी कडेला कार थांबवली त्यानंतर दरवाजा उघडा ठेवत ते नैसर्गिक पूजेसाठी गेले असता अंधाराचा फायदा घेत 3 चोरट्यांनी दरवाजा उघडून कारमध्ये प्रवेश करत 41 ग्राम सोन्याचे दागिने रोख दहा हजार रुपये व मोबाईल असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अशोक खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात तीन चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेचा अधिक तपास धाराशीव पोलीस करत आहेत. मागील वर्षभरापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये धाडसी चोरीचे सत्र वाढले आहे यामुळे नागरिकासह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या चोरटेच्या मुस्क्या तात्काळ आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 Comments