धाराशिव :जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ,बारामती फलटण येथील ३ आरोपीस अटक ,7 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी -
धाराशिव : वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेल्या म्हशी चोरी प्रकरणातील तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून तीन म्हशीसह 7 लाख 30 हजार रुपयांचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बारामती फलटण या शहरातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेनी केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी क मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार,याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून पेट्रोलींग करीत असताना तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीद्वारे, माहिती काढुन पो स्टे वाशी गुरनं 390/2025 कलम 303(2) बीएनएस हा गुन्हा आरोपी नामे रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, रा. फलटन याने त्याचे अन्य साथीदारासह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीची माहिती काढुन शोध घेत असताना आरोपी नामे रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते, वय 33 वर्षे, रा. कणसे वस्ती, गुणवरे ता. फलटन जि. सातारा हा मिळुन आल्याने त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे ऋषीकेश बिंटु जगताप, रा. गोखली ता. फलटन जि. सातारा व राहुल सुभाष सपकाळ, रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे असे तिघांनी मिळून केला असल्याचे सांगीतले.
त्यावरुन पथकाने इतर दोन आरोपीचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडे गुन्ह्यामधील गेला माल तीन म्हशी याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या म्हशी या रविंद्र उर्फ बुठा ठकसेन रायते याचे घरासमोरील असलेल्या झाडीमध्ये बांधुन ठेवलेल्या असुन त्या आज बारामती येथील बाजारात विक्रीसाठी घेवून जाणार आहोत असे सांगीतले. त्यावरुन पथकाने गुणवरे येथे जावून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 03 म्हशी व गुन्ह्यात वापरलेले वाहन पिकअप हे ताब्यात घेवून 03 म्हशी व पिकअप वाहन असे एकुण 7,30,000₹किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी मा. श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद इज्जपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सचिन खटके, स.पो.नि., पोलीस हावलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोलीस हावलदार प्रशांत किवंडे यांचे पथकाने केली आहे.

0 Comments