उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडी अपघात प्रकरण, जखमी कुसुम सुदे यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू-
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे वय (30) यांनी अखेर आज मंगळवारी दि, 25 रोजी उपचारादरम्यान प्राण गमवले यामुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . उपमुख्यमंत्री अजित पवार दि, 22 रोजी परतून अवस्था येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव- धारूर महामार्गावरील धनकवड फाटा येथेही दुर्घटना घडली होती यात सुदे पती-पत्नीची आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या.
ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सूदे त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे वय (35) आणि दोन लहान मुली रागिनी वय (9) व अक्षरा (6) या गंभीर जखमी झाले आहेत. झालेला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी संपूर्ण उद्ध्वस्त झाली आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले तातडीने स्थानिक आणि स्पर्धा दाखवण्यात धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. कुसुम सुदे यांची स्थिती अत्यंत नाजूक होती डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु गंभीर दुखापतीमळी उपचार सुरू असताना त्यांची मंगळवारी सकाळी प्राणज्योत माळवली त्यांच्या निधनाने सुदे कुटुंबसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेमुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन निष्पाप मुलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरवले.या अपघाताची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी सुदे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी केली आहे. हृदय द्रावक घटनेने व्हीआयपीच्या ताब्यातील वाहनांचा वेग व सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभा केले आहे.

0 Comments