वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाचे अपहरण चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना-Kidnapping Crime Lohara Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाचे अपहरण चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना-Kidnapping Crime Lohara Police Station

वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाचे अपहरण चौघाजणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना-


धाराशिव : लोहारा तालुक्यातील करजगाव शिवारात एका अल्पवयीन मुलाचे चौघा जणांनी मिळून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाणे येथे चार आरोपी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील करजगाव शिवारात दिनांक 3 ऑक्टोंबर 2025 रोजी नागू पवार यांच्या शेतातून सागर बाळू भोजराव      वय 13 वर्षे, (रा. हिप्परगा सय्यद ता. लोहारा जि. धाराशिव)  याचे आरोपी नामे-नवनाथ कदम, शुभम नवनाथ कदम, सुमित्रा नवनाथ कदम, सर्व (रा. सिरसदेवी ता. गेवराई जि. बीड,) अभिषेक अशोक म्हस्के, (रा. राक्षसभुवन ता. जि. बीड) यांनी  11.30 वा. सु. करजगाव शिवारात नागु पवार यांचे शेतातील गोठ्यातुन अपहरण करून नेले . तसेच मुलाचे वडील बाळु वसंत भोजराव, वय 52 वर्षे, रा. हिप्परगा सय्यद ता. लोहारा जि. धाराशिव यांना आरोपीने आमच्या सोबत पाठव नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकेन अशी धमकी देवून फिर्यादीचे मुलास बळजबरीने गाडीमध्ये बवसून पळवून नेले अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळु भोजराव यांनी दि.27.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे लोहारा येथे भा.न्या.सं.कलम 134 (2), 115(2),352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा अधिक तपास लोहारा पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments