खून का बदला खून से...! दहा वर्षांनी घेतला वडिलांच्या मृत्यूचा बदला, तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे कुऱ्हाडीने सपासप वार करून तरुणाची भर चौकात हत्या ; आरोपीस अटक-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील मुख्य चौकात शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक एका तरुणाने चावडी चौकातील टपरी चालक गुरु सिद्धप्पा उर्फ सिद्धाराम पंडित दहिटणे वय 35 राहणार केशेगाव यांच्यावर कुऱ्हाडीने गाव घालत भर दिवसा चौकात खून केला. यामुळे गाव परिसरात एकच खळबळ उडाली अनेक जण भीतीमुळे रस्ता मिळेल तिकडे धावले हा संपूर्ण थरार तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेमुळे गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीस ताब्यात घेतली आहे. हा खुन आरोपी निखिल कांबळे यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. या घटनेमुळे केशेगाव सह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,मयत सिध्दाराम पंडित दहीटणे (वय ३५ वर्ष ) हा युवक सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केशेगाव येथील चावडी चौकातील हॉटेलच्या बाजूस खुर्चीवर मोबाईल पाहत बसलेला होता त्या वेळेस केशेगाव येथील पंचवीस वर्षीय युवक आरोपी निखिल सोमनाथ कांबळे हा मोटार सायकलवर चावडी चौकात आला आणि हातात कुऱ्हाड घेऊन तो मोबाईल पाहत बसलेल्या मयत सिध्दाराम पंडित दहीटणे यांच्या पाठीमागे गेला आणि हातातील कुऱ्हाडीने सिध्दाराम याच्या मानेवर सपासप वार केले जवळपास सात ते आठ कुऱ्हाडीने जबर घाव केल्याने सिध्दाराम दहीटणे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.आणि आरोपी निखिल कांबळे हा सिध्दाराम याचा खून करून परत तो मोटार सायकलवरून निघून गेला.घटनेची माहिती कळताच नळदुर्ग पोलीस स्टेशन व इटकळ औट पोस्टचे पोलीस घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला कोणी पोलिसांनी तात्काळ गुप्त माहितीच्या आधारे तांदळवाडी परिसरात पुण्याला जात असताना आरोपी निखिल कांबळे याला अटक केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी नळदृग पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .या हत्येचा संपूर्ण थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे यामध्ये आरोपी हा निर्भयपणे येऊन ही हत्या करून शांतपणे घटनास्थळावरून निघून जात असल्याची दिसते घटनेची माहिती मिळताच सुमारे तासाभरात ईटकळ पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वडिलांच्या मृत्यूचा बदला , दिवसा ढवळ्या हत्या
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निखिल कांबळे यांचे वडील सोमनाथ कांबळे यांचा दहा वर्षांपूर्वी हत्या झालेल्या ठिकाणीच मयत सिद्धाराम दहिटणे यांच्या पान टपरीवर विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता आणि या मृत्यूला सिद्धाराम दहिटणे हाच जबाबदार असल्याचा राग आरोपी निखिल याच्या मनात कायम होता; यातूनच आपल्या वडिलांच्या दहा वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचा बदला म्हणून त्यांनी टपरी चालक सिद्धाराम याची हत्या केल्याची चर्चा होत आहे आरोपी मागील काही काळापासून पुण्यात काम करत होता तो दिवाळी सणासाठी गावाकडे आला होता त्यांच्या घरात आई भाऊ असा परिवार आहे तर मयत सिद्धाराम हा एकटाच असल्याचे कळते.
शनिवारी सकाळी 9:00 वाजण्याच्य निखिल ला समजले की गुरु शिधाप्पा ग्रामपंचायत चावडी जवळ मित्रासोबत बसले आहेत रागाच्या भरात त्याने आपल्या मोटरसायकलला कुऱ्हाड बांधले आणि थेट त्यांनी चावडी चौकात धाव घेतली तेथे दोघांमध्ये काही वेळ तोंड भांड वाद झाला काही क्षणातच आरोपी निखिल ने हातातील कुऱ्हाड उभारून गुरु सिद्धप्पा यांच्या मानेवर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. यात गुरु सिद्धप्पा रक्ताच्या थारोळ्यात पडले अन् जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

0 Comments