महाराष्ट्र राज्य माजी सैनिक सेल संघटना शिवसेना (शिंदे घट) पक्षाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी माजी सैनिक संभाजी काळजाते यांची निवड-
तुळजापूर प्रतिनिधी : तालुक्यातील चिवरी येथील माजी सैनिक संभाजी बळीराम काळजाते यांची महाराष्ट्र राज्य माजी सैनिक सेल संघटने कडून वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री) यांचे आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री संभाजी काळजाते यांनी माजी सैनिकाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून संघटनेमध्ये मागील दोन वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माजी सैनिक सेल संघटना अध्यक्ष एडवोकेट सरदार पांडुरंग चोपडे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. त्यांच्या या निवडीच सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


0 Comments