चिवरी पंचायत समिती गणातून शंकर बिराजदार काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक -
चिवरी / प्रतिनिधी बिभिषन मिटकरी: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत आणि तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे या गणात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे .या चिवरी पंचायत समिती गणातून मौजे चिवरी येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा नेते शंकर बिराजदार हे या काँग्रेस पक्षा कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. शंकर बिराजदार यांनी सामाजिक कार्यातून गाव परिसरात विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. कारण आज पर्यंत चिवरी पंचायत समिती गण हा काँग्रेसचच बालेकिल्ला असल्याचे दिसून येते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जर या चिवरी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचेही श्री. शंकर बिराजदार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनदुर गटातील चिवरी पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्ष आपणास संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

0 Comments