खळबळजनक घटना :कोटीचा विमा उचलण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळल! पण 'तिला' केलेल्या एका मेसेजमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

खळबळजनक घटना :कोटीचा विमा उचलण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळल! पण 'तिला' केलेल्या एका मेसेजमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Murder Crime News

खळबळजनक घटना : कोटीचा विमा उचलण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्याला कारमध्ये जिवंत जाळल! पण 'मैञिणीला' केलेल्या एका मेसेजमुळे मर्डर मिस्ट्री उलगडली; लातूर जिल्ह्यातील घटना- 


लातूर/ प्रतिनिधी रूपेश डोलारे : लातूरमध्ये एका कारमध्ये  50 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होता. पण, एखाद्या सिनेमाला लाजवेल असं सत्य या प्रकरणात समोर आलं आहे. ज्या तरुणाचा कारमध्ये जळून मृत्यू झाला असं सांगितलं जातं होतं, तो जिवंत असल्याचं उघड झालं आहे. मृत तरुणानेच विम्याचे पैसे लाटण्यासाठी हा सगळा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघड केली आहे.

मुंबईत घेतलेल्या फ्लॅटचा व एक कोटीच्या विम्याचा हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत यामुळे स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून लिफ्ट मागितलेल्या मद्यधुंद एकाला कारमध्ये बसवत त्याला खाऊ पिऊ खातले, झोपेत असताना कार लॉक करून ती पेटवून दिली यात मयत स्वतःच आहे अशी भासण्यासाठी हातातील कडे कार मध्ये ठेवले कार जळून खाक होताच आरोपीने कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्गला(Sindhudurg) पलायन केले. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनी मात्र अवघ्या 24 तासातच त्या आरोपीच्या मुसक्या  आवळून जळीत कारमधील खुनाचा(Murder Crime)  उलगडा केला आहे. या घटनेने औसा शहरासह (Ausa city latur)जिल्ह्यामध्ये एकच खळबळ  उडाली आहे.

औसा शहरात जवळील वानवडा रस्त्यावर शनिवारी दि, 13 रोजी मध्य रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक कार जळत असल्याचा निनावी फोन डायल 112 वर आला होता. त्यावरून औसा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत अग्निशामक विभागाची गाडी होती. पेटलेली कार विजवण्यात आली त्यावेळी त्या कारमध्ये एकाचा जळून मृत्यू झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी जळते अवस्थेतील कारची नंबर प्लेट(Number plate) काढून घेतली; त्यावरून सदर कारचा शोध घेतला असता ती कार बळीराम राठोड यांच्या नावावर असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मयताच्या हाडाचा सांगाडा गाडीत सापडलेली हातातील कडे जप्त केले. कड्यावरून सदर मृतदेह गणेश चव्हाण याचा असावा असा अंदाज बांधून हाडाचा सांगाडा त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला. परंतु त्याची दफन करण्यास सांगितले त्यापूर्वीच पोलिसांनी मृताच्या हाडाचे नमुने घेऊन डीएनए तपासणी पाठवून दिली आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून गस्तीवरील स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB) पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह त्यांचा चमू घटनास्थळी दाखल झाला ;तेथे आधीच औशाचे पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे उपविभागी पोलीस अधिकारी चौधरी हजर होते. पोलीसांनी घटनास्थळी परिसराची पाहणी केली त्यावेळी चिकनचे तुकडे व दारूच्या बाटल्या मिळून आल्या त्यावेळी घटनेपूर्वी तेथे पार्टी झाल्याचा संशय पोलिसांना आला.

कार मध्ये बसून गावाकडे जाऊन येतो म्हणून गेलेले गोविंद किशन यादव वय 50 (राहणार पाटील गल्ली औसा) हे हरवल्ची तक्रार दाखल झाली आहे .आरोपी गणेश चव्हाण यांच्या कबुली वरून कार मध्ये जळालेला मृतदेह हा गोविंद यादव याचाच असावा असा संशय पोलिसांना आहे त्यावरून पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल डाके यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (राहणार विठ्ठल नगर औसा )यांच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 521 / 25 भारतीय न्याय संहिता(BNS Section) कलम 103 (1) 238 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे हे करत आहेत.

लिफ्ट मागितलेल्या मद्यधुंद इसमाला बसवुन पेटवली कार आणि झोपलेल्या गोविंद यादवची त्यांनी केली शिकार

गणेश चव्हाण यांनी शनिवार दिनांक 13 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास औसा येथील टी पॉइंटवरून बोरफळला निघालेल्या गोविंद किशन यादव वय 50 राहणार (बोरफळ ता. औसा हं.मु  पाटील गल्ली औसा तालुका औसा जिल्हा लातूर) )यांना त्यांच्या कारमध्ये लिफ्ट दिली होती .गणेश चव्हाण यांनी मुंबईत घेतलेल्या फ्लॅटचा हप्ता व त्याचा एक कोटीच्या विम्याची हप्ते भरणे मुश्किल झाले होते .मद्य धुंदी अवस्थेतील गोविंद यादव यांनाच कारमध्ये बसवुन जाळून मीच मयत झाल्याचा बनाव रचनेचा डाव त्याला शिवून गेला. त्यामुळे गणेश चव्हाण यांनी त्याची कार औसा शहर संपताच वानवडा रस्त्याला वळवली तत्पूर्वी गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव यांना खाण्यासाठी चिकन व पिण्यासाठी दारू घेतली; त्यांनी गोविंद यादव यांना दारू पाजून चिकन खाऊ घातले ते खाल्ल्यानंतर गोविंद यादव यांना झोप लागली. झोपलेली अवस्थेतच गणेश यांनी गोविंद यादव यांना चालकाच्या सीटवर बसवले त्यांना शेडबिल्ट बांधला कार मध्ये काडीपेटीच्या काड्या पसरवल्या टॉवेल पसरून ठेवत गाडीची पेट्रोल टाकी उघडी ठेवली कारने पेट  घेताच गणेश चव्हाण यांनी तिथून पोबारा केला.

अशा पद्धतीने पोलिसांनी सिंधुदुर्ग मधून गणेश चव्हाण ला घेतले ताब्यात 

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी तांत्रिक तपास करून तीन संशयताना ताब्यात घेतली त्यात एका महिलेचाही समावेश होता; सदर महिला गणेश चव्हाण यांची मैत्रीण आहे ती गणेश चव्हाण यांच्यासोबत व्हाट्सअप ला बोलत होती पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली;  तर गणेश हा दुसऱ्या मोबाईल वरून तिच्याशी संवाद साधत होता. त्या क्रमांकाची मेसेज तिला येत होते त्यामुळे कार मध्ये जळालेला मयत गणेश चव्हाण नसून दुसराच कोणीतरी असल्याची खात्री पोलिसांना झाली .त्यावरून पोलिसांनी त्या नंबरची लोकेशन काढले ते कोल्हापूर मध्ये दाखवत होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रातोरात कोल्हापूर गाठले तेथे गेल्यानंतर गणेश चव्हाण हा सिंधुदुर्ग मध्येच गेल्याचे दाखवले पोलिसांनी सिंधुदुर्ग मधून गणेश चव्हाण यांना ताब्यात  घेतली.

अवघ्या 24 तासात अवघड प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षक  पोलिसांना देणार बक्षीस 

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली औसाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, औसाचे पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे,  साहेब पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ ,अंमलदार अर्जुन राजपूत ,महादेव बिलापट्टे ,युवराज गिरी ,तुराब पठाण, ,रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, ,सर्जेराव जगताप, राजेश कंचे, श्रीनिवास जोंधळे, औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल डोके भाऊसाहेब माळवदकर ,अमलदार मोतीराम घुले ,रामानंद गुट्टे,मुजाक सय्यद, हनुमंत पडिले,दिनेश गवळी ,अशोक राठोड, रतन शेख ,येनकुरे,  महेश मर्डे ,बालाजी चव्हाण, भरत भुरे, महेश क्षीरसागर ,सोमनाथ खडके ,बालिका सरवदे,सदाशिव तंदुरी ,सचिन मंदाडे, भागवत गामारे सूर्यकांत मगर, गोविंद पाटील, सायबर सेलचे शैलेश सुळे, कॉनिस्टेबल अंजली गायकवाड यांनी ही कामगिरी बजावली अवघ्या 24 तासात अवघड प्रकरणाचा छडा लावल्याने पोलीस अधीक्षकाच्या वतीने पोलिसांना बक्षीस देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments