तुळजापूर : सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर यांना पितृशोक-
तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे:-तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक एक मनमिळाऊ व हसमुख व्यक्तीमत्व किसन शंकरराव हंगरगेकर वय (70) वर्षं यांचे रविवारी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 11:30 वाजता काटी येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे, तीन भाऊ,तीन बहिणी, भावजय,जावाई असा परिवार आहे.ते सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर यांचे वडिल होत.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments