शेत रस्ता मागितल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर जीव घेणा हल्ला; दोन जनावर गुन्हा दाखल-Half -Murder Crime News
धाराशिव: शेत रस्ता मागितलीच्या कारणावरून एका शेतकऱ्यास दोन जणांनी मिळून लोखंडी सळीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केली ही घटना दिनांक २४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भूम येथे घडली .येथील मीनाक्षी बाबुराव मोटे यांच्या शेताजवळ पिंपळगाव पाटी ते गिरवली गावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्यावर फिर्यादीने नमूद आरोपींना जाण्या येण्यास रस्ता मागितलेच्या कारणावरून सदर फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला या प्रकरणी दोन जनाविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-स्वप्नील बाळु जानराव, नाना माने दोघे रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.24.01.2026 रोजी 15.00 वा. सु. मिनाक्षी बाबुराव मोटे यांचे शेताजवळ पिंपळगाव पाटी ते गिरवली गावाकडे जाणारे शेत रस्त्यावर फिर्यादी नामे- देवराव दत्तु मोटे, वय 39 वर्षे, रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जाण्यास रस्ता मागीतल्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-देवराव मोटे यांनी दि.24.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 109(1), 118(1), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.

0 Comments