नळदुर्ग व ईटकळ बस स्थानक परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे; पत्रकार सुनील बनसोडे यांची नळदुर्ग पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी-Naldurg-Itkal Police Station Boundry Mataka

Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग व ईटकळ बस स्थानक परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे; पत्रकार सुनील बनसोडे यांची नळदुर्ग पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी-Naldurg-Itkal Police Station Boundry Mataka

नळदुर्ग व ईटकळ बस स्थानक परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे; पत्रकार सुनील बनसोडे यांची नळदुर्ग  पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी-


तुळजापूर प्रतिनिधी/  रुपेश डोलारे: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग व इटकळ  बस थांबा परिसरात अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत, या व्यवसायिकांना ना वरिष्ठ अधिकाऱ्याची भीती ना स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्याची भीती यामुळे हे   अवैध व्यावसायिक राजरोसपणे दुकाने थाटून बसले आहेत याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तात्काळ या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पत्रकार सुनील बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की, नळदुर्ग इटकळ बस थांबा परिसरात कल्याण मुंबई व इतर नावाने सुरू असलेला मटका जुगार  हा राजरोसपणे दुकाने थाटून सुरू आहे. तसेच इटकळ येथील आपल्या पोलीस चौकी समोरील चौकामध्येच मटक्यासह चक्री जुगार सुरू आहे. तसेच नळदृग व ईटकळ या दोन बस स्थानकावर नेहमी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते.  कळत नकळत विद्यार्थ्यांना मटका व चक्री जुगाराचे आकर्षण वाटून त्यांची पावले या जुगाराकडे वळू शकतात.

आपण आपल्या हद्दीतील किमान या दोन ठिकाणची दुकाने तरी बंद करावी अन्यथा या विरुद्ध न्यायविलाजास्व जन आंदोलनासह मला आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा मार्ग अवलंबवावा लागेल. आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात त्यामुळे अशा धंद्यांना खत पाणी घालून भावी विद्यार्थ्यांची पिढी जुगारमय होणार नाही  याची दक्षता घ्याल व योग्य ती कारवाई कराल ही अपेक्षा असे निवेदनात  नमूद करण्यात आले आहे तसेच या निवेदनाची प्रत माहिती तालुक्याचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments