मौजे शिरगापुर येथील शेतकरी पुत्र विशाल जाधव यांची मुंबई कारागृह पोलीस पदी निवड-Jail Police Selection Farmer Boy

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे शिरगापुर येथील शेतकरी पुत्र विशाल जाधव यांची मुंबई कारागृह पोलीस पदी निवड-Jail Police Selection Farmer Boy

मौजे शिरगापुर येथील शेतकरी पुत्र विशाल जाधव यांची मुंबई कारागृह पोलीस पदी निवड-


--------------------------------------------

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत केले यश संपादन. ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत

---------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे शिरगापुर येथील शेतकरी पुत्र विशाल शिवाजी जाधव यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शेतकरी वडिलांचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करून यश संपादन केले.जिद्द चिकाटी मेहनत आत्मविश्वास आणि सातत्य यांची सांगड घातली की अशक्य ही शक्य करता येते हेच ग्रामीण भागातील शिरगापुर येथील शेतकरी पुत्र विशाल जाधव यांनी दाखवून दिले.परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना ही मुलगा पोलीस व्हावा ही वडिलांची आस पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशाल जाधव हा धाराशिव येथील अकॅडमीत सराव करीत होता अखेर त्याच्या जिद्दीला व मेहनतीला यश मिळाले आणि त्याची मुंबई कारागृह येथे पोलीस पदी निवड झाली. विशाल शिवाजी जाधव यांची मुंबई कारागृह येथे पोलीस पदी निवड झाल्याने गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे. नियमित अभ्यास व सातत्य ठेवले की यश नक्कीच मिळते असे मुंबई कारागृह पोलीस पदी निवड झालेले विशाल जाधव यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments