धाराशिव बसस्थानकात मध्यरात्री बसची तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या २४ तासाच्या आज पोलिसांनी मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई -Local Crime Bureou Dharashiv
धाराशिव : धाराशिव बस स्थानकामध्ये दिनांक 22 रोजी मध्यरात्री बसची तोडफोड करणाऱ्या अनोळखी इसमाचा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बसची तोडफोड करतानाचा व्हिडिओ कैद झाला होता. त्यानुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , मा. पोलीस अधीक्षकी श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे आदेशावरुन धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.22.01.2026 रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असताना, धाराशिव बसस्थानकावर बसची तोडफोड झाले बाबत आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं25/2026 कलम 324(5),3(5) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल असुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तांत्रीक विश्लेषनाद्वारे व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धाराशिव बसस्थानक येथे बस फोडणारे इसम व सदर कार ही कळंब येथे आहे, अशी माहिती मिळल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून आरोपी नामे- साईनाथ गणेशराव सावंत, वय 25 वर्षे, रा. गणेशराव सावंत गोर्था उमरी नांदेड, श्रावण उर्फ पंपु राजेंद्र शिंदे, वय 25 वर्षे, रा. तलवाडा ता. गेवराई जि. बीड, अमोल भिमराव भोंग, वय 24 वर्षे, रा. राहेगाव ता. जि. नांदेड, यांना ताब्यात घेवून विचार पुस केली असता नमुद आरोपींनी सांगीतले की, आमचे संस्थेचे अध्यक्ष हे मागील काही दिवसापासुन तांदुळवाडी ता. कळंब येथे आमरण उपोषण करीता बसलेले आहे, त्याची दखल घेण्यात आली नाही, म्हणुन आम्ही शासनाचे लक्ष् वेधन्यासाठी धाराशिव जिल्ह्याचे बस स्थानक येथे जावून बसला उपोषणाचे कागद चिटकावुन नंतर उभे असलेले बसवर निषेर्धात म्हणून दगड मारुन नुकसान केले. असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. नमुद आरोपींनी सदर गुन्ह्याती वापरलेली ओंरा होंडा कार क्र एमएच 25 ए.एस. 5142 एकुण 7,50,000₹ किंमतीची ताब्यात घेण्यात आली आहे. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी आनंदनगर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि-श्री. विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, पोलीस हावलदार-अमोल निंबाळकर, अमोल चव्हाण, बळी शिंदे, मपोहेकॉ/ शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे.

0 Comments