विवाहतेची सासरच्या जाचास गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जनाविरुद्ध गुन्हा दाखल- तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव : सासरच्या जाचास कंटाळून एका विवाहतिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील देवशिंगा तुळ येथे घडली आहे, ही घटना दिनांक 21 रोजी घडली या प्रकरणी सासरच्या सहा जनाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत नामे-मुस्कान उर्फ पायल सुशील भालेराव, वय 19 वर्षे,रा.देवसिंगा (तुळ) पाटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.01.2026 रोजी 16.00 वा.सु. राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-पती सुशील हनुमंत भालेराव, सासरे हनुमंत भालेराव, सासु जयश्री भालेराव, दिर स्वप्नील हनुमंत भालेराव, पंचशीला स्वप्नील भालेराव, मयुरी हनुमंत भालेराव सर्व रा. देवसिंगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत मुस्कान हीस वारंवार किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन वारंवार शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत मुस्कान यांनी आत्महत्या केली आहे. वगैरे आ.मृ नं 05/2026 चौकशीत फिर्यादी नामे-रहेमान मोहम्मद शेख, वय 31 वर्षे, रा. जयभवानी चौक ईस्लामपुरा धारुर चौक केज ता. केज जि. बीड यांनी दि.24.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 3(5)भान्यासं अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

0 Comments