ज्यादा व्याजदर परतावाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक,महिला पतसंस्थेतील 12 जणांवर गुन्हा दाखल धाराशी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार-Scam Fraud Dharashiv Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : जास्त व्याजदराची आमिष व हमी देऊन पतसंस्थेतील एका ठेवीदाराची 5 लाख 85 हजार रुपयाची  आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील बेंबळी चतुर्श्रुंगी महिला सरकारी मर्यादित पतसंस्थेमध्ये घडली आहे याप्रकरणी ठेवीदार लक्ष्मीबाई शिंदे यांचे पती प्रेमराज शिंदे यांच्या फिर्यादीवरून महिला पतसंस्थेच्या चेअरमन ,व्हाईस चेअरमन ,सचिव यासह एकूण 12 जणांवर बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-मनिषा प्रमोद पवार चेअरमन, अर्चना श्रीहरी शिवलकर व्हा. चेरमन, जयश्री धनंजय मुंगळे सचिव, प्रतिभा बालाजी गावडे, संचालक, श्रीदवेी युवराज दाणे, जयदबी इराफान शाह, सुवर्ण रवि कांबळे, अनिता अनिल कांबळे, सुषमा महादेव माळी(लोखंडे), मिना गौतम जावळे, सुरेखा बालाजी ढोरमारे, धनंजय जनार्धन मुंगळे सर्व रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 01 सप्टेंबर 2020 ते दि. 07.11.2022 रोजी 22.51 वा. पावेतो बेंबळी येथे  श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्था मर्या, बेंबळी येथे खाते काढुन संक्षेप ठेव पैसे देण्या घेण्याचा व्यवहार केलेला आहे. सदर पतसंस्थेने फिर्यादीस जास्त व्याज दराची हमी व खात्री देवुन सप्टेंबर 2020 पासुन  व्याज देणे बंद केले असुन फिर्यादीची पत्नी लक्ष्मीबाई यांचे नावे ठेवलेल्या मुददत रक्कम 5,85,00₹ परत न करता फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रेमराज शिंदे यांनी दि.16.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे बेंबळी येथे भा.दं. वि.सं.कलम 420, 409, 406, 415, 147, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा अधिक तपास बेंबळी पोलीस करत आहे. 

Post a Comment

0 Comments