तुळजापूर : मोटासायकलची समोरासमोर धडक ,एक जण ठार- तामलवाडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Motorcyle Accident News Tamalwadi Police Station
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द येथील अंकुश सरडे हे दिनांक 22 जानेवारी रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल वरून जात असताना दरम्यान मसला खुर्द येथील मोटरसायकल चालक आबाराव जाधव यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल हाय गईने व निष्काळजीपणे चालून अंकुश सरडे यांच्या मोटार सायकल ला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये अंकुश सरडे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. याप्रकरणी आप्पासाहेब सुग्रीव सरडे राहणार पिंपळा खुर्द यांनी दिलेले फिर्यादीवरून आबाराव अनुरथ जाधव यांच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत नामे-अंकुश रामचंद्र सरडे, वय 37 वर्षे, रा. पिंपळा खु ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.22.01.2026 रोजी 14.50 वा. सु.मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 1028 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्रमांक एमएच एमएच 24 बीव्ही 2411 चा चालक आरोपी नामे- आबाराव अनुरथ जाधव, रा. मसला खु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अंकुश सरडे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अंकुश सरडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आप्पासाहेब सुग्रीव सरडे, वय 38 वर्षे, रा. पिंपळा खु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए) (बी), 106 (1) सह 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास तामलवाडी पोलीस करत आहे.

0 Comments