शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय- गहू निर्यातीला केंद्र सरकारकडून मान्यता गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनांना तसेच साखर निर्यातीला दिली परवानगी-Sugar export farmers Good News
मुंबई : भारत सरकारने 25 लाख मॅट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गावाच्या इतर उत्पादनाच्या निर्यातीला मान्यता दिली आहे यामुळे देशांतर्गत बाजारपेठेला स्थैर्य मिळेल आणि उत्पादकांना लाभदायक परतावा मिळेल यासाठी हे निर्णायक आणि शेतकरी केंद्रित पाऊल उचलले आहे सध्याची उपलब्धता आणि किमतीच्या परिस्थितीचे व्यापक मूल्यांकन केल्यानंतर विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा निर्णय शेतकऱ्याचे हित रक्षण करण्याच्या सरकारच्या वचन पद्धतीला पुनश्य समर्थन देतो 2025 26 दरम्यान खाजगी संस्था कडे सुमारे 25 लाख मॅट्रिक टन गव्हाचा साठा आहे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हा साठा जवळजवळ 32 लाख मॅट्रिक जास्त आहे .वर्षांवर्षी होणारी ही लक्षणे वाढ देशातील पुरवठ्याची स्थिती व्यवस्थित असल्याची दर्शवते याच सोबतच साखरेची निर्यात सुलभ करण्यासाठी भारत सरकारने चालू साखर हंगाम 2025 26 दरम्यान इच्छुक साखर कारखान्यांना अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी सरकारने 14 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेले आदेशानुसार 2025 26 या चालू वर्षातील साखर हंगामा दरम्यान 15 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिलेली आहे या निर्णयामुळे साखर निर्यात वाढण्यास मदत होईल आणि देशातील अतिरिक्त साखर उपलब्धतेचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
साखर कारखान्यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत फक्त 1 लाख 97 एल एम टी साखर निर्यात करण्यात आली आहे याशिवाय साखर कारखान्यांनी आजपर्यंत अंदाजे 2.72 एल एम टी साखर निर्यातीसाठी करार केलेला आहे .जर इच्छुक साखर कारखान्याची वाटप केलेल्या प्रमाणापैकी किमान 70 टक्के साखरेची निर्यात 30 जून 2026 पर्यंत केली तर त्यांना अतिरिक्त 5 एल एम टी साखर निर्यात करता येईल .इच्छुक साखर कारखान्यांना प्रमाणानुसार निर्यात कोटा वाटप केला जाईल आणि कारखान्यांना ऑर्डर जारी झाल्यापासून पंधरा दिवसाचे आजचे त्यांच्या तयारीचे सादरीकरण करतील अशा प्रकारे वाटप केलेल्या निर्यात कोटा इतर कोणत्याही साखर कारखान्यासोबत बदलला जाणार नाही किंवा त्याची अदलाबदल केली जाणार नाही..

0 Comments