तुळजापूर पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ; राजकीय घडामोडींना वेग-Tuljapur Panchayat samiti election

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ; राजकीय घडामोडींना वेग-Tuljapur Panchayat samiti election

तुळजापूर पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ; राजकीय घडामोडींना वेग- 


तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीने आपले वर्चस्व स्थापित  केले आहे . यामध्ये तुळजापूर पंचायत समिती निवडणुकीतील 18 गणांपैकी 12 गणावर महायुती उमेदवारांनी विजय मिळवला आहे . त्यामुळे तुळजापूर पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आता सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीकडे विजयी उमेदवाराचे लक्ष लागले आहे .सभापती उपसभापती पदासाठी इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे .त्यामुळे सभापती उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे नागरिकांची लक्ष वेधले आहे. त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला .

2017 साली पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या सभापती पदाचा कार्यकाळ संपून तीन वर्षाचा काळ उलटून गेला असून प्रशासकामार्फत पंचायत समितीचा गाडा हाकला जात आहे .यामध्ये सामान्य लोकांचा अनेक तक्रारी असून प्रशासनाने अक्षरशा  लाभार्थ्यांना पिळून काढले आहे चेरीमेरी शिवाय कोणतीही काम होत नसल्याचा आरोप होत असून कोणत्याही लोकप्रतिनिधींचे सरकारी बाबू ऐकणासे  झाले आहेत .त्यामुळे सामान्य जनतेमधून अधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. एकंदरीत ग्रामीण भागातील अनेक विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे नवीन सभापती कडून ग्रामीण भागातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

तुळजापूर तालुक्यातील 18 जणांपैकी 6 गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते .तसेच 18 जागापैकी 12 जागावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तुळजापूर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात आरक्षित असल्याने पंचायत समिती निवडणुकीत आता पंचायत सभापती पदासाठी ,उपसभापती पदासाठी इच्छुकांनी वरिष्ठ नेते मंडळीकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील 18 जणांपैकी 6 गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होते यामध्ये काटी, सावरगाव अणदुर,  चिवरी खुदावाडी, जळकोट आदी गणांचा समावेश असून या गणातील उमेदवाराच्या गळ्यात सभापतीची माळ पडणार हे निश्चित आहे या 6 गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले असून यामध्ये  प्रवीण भोसले,  रणवीर चव्हाण, संतोष बोबडे ,भिवा इंगोले आशिष सोनटक्के, विक्रम देशमुख यांचा समावेश आहे .

गतवर्षीपासून तुळजापूर पंचायत समिती समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तील वरिष्ठ नेते कोणाला  सभापती ,पदाची संधी कोणाला देणार? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर प्रशासनावर वचक बसवणाऱ्या व्यक्तीचीच सभापती पदी निवड होणे गरजेचे असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे आता निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार? याकडेही नागरिकाची लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments