जानेवारी–फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीला राज्याची मंजुरी-Grampanchyat Election
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. 14 डिसेंबर 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार मुदत संपलेल्या किंवा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्या अनुषंगाने, जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच निवडणुका होऊन नवनिर्मित ग्रामपंचायती अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासन यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेऊनच घेण्यात आला आहे. जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज खंडित होऊ नये व ग्रामविकासाची गती कायम राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

0 Comments