जमिनीच्या वादातून एकास मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल- तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Crime News
धाराशिव (प्रतिनिधी) – नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील तुळजापूर तालुक्यातील कार्ला शिवारात जमिनीच्या वादातून एका 36 वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ गेमु आडेकर, नंदना नवनाथ आडेकर, सुरेश गेमू आडेकर, मनिषा सुरेश आडेकर, उत्तम गेमु आडेकर, छाया उत्तम आडेकर, गेमु किसन आडेकर व घमाबाई गेमु आडेकर (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास कार्ला शिवारातील शेत गट क्रमांक 137 येथे फिर्यादी ज्ञानेश्वर श्रीकांत श्रीनामे (वय 36, रा. कार्ला) यांना जमीनीच्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना जखमी केले तसेच शेतातील शेडचे लोखंडी गेट व कुलूप तोडून सुमारे तीन हजार रुपयांचे नुकसान केले. यावेळी फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर श्रीकांत श्रीनामे यांनी दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189, 189(1)(2), 324(2), 329(1), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करीत आहे.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून संबंधित आरोपींच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments