तुळजापूर आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीचा शुभारंभ-NCMC
तुळजापूर (प्रतिनिधी) — दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर आगारात प्रवासी सेवेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि एबिक्स कॅश' (EbixCash) यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) प्रकल्पांतर्गत स्मार्ट कार्ड नोंदणीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास आगार व्यवस्थापक रामचंद्र शिंदे, आगार लेखाकार सुधीर बामनकर तसेच कर्मचारी जी.एम.घुगे,विलास राठोड,अमोल जाधव, बाळासाहेब मुगुटराव, एम. व्ही. सुरवसे आणि वाहतूक नियंत्रक गजेंद्र कांबळे उपस्थित होते. कंपनीच्या वतीने प्रतिनिधी राहुल सूर्यवंशी यांनी तांत्रिक मार्गदर्शन करत स्मार्ट कार्डच्या वापराबाबत माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान महामंडळाच्या दोन महत्त्वाच्या योजनांअंतर्गत प्रथम स्मार्ट कार्डांची नोंदणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना डिजिटल पद्धतीने तिकीट खरेदी करता येणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे तुळजापूर तालुक्यातील प्रवाशांना आधुनिक डिजिटल पेमेंट प्रणालीचा लाभ मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

0 Comments