लाडक्या बहिणींना दिलासा : ई- केवायसीतील त्रुटी सुधारण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ! पोर्टलवर दुरुस्तीची सुविधा सुरू-
मुंबई/प्रतिनिधी रुपेश डोलारे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी ई-केवायसी (E-Kyc)करताना अर्जात तांत्रिक किंवा माहितीविषयक चुका केल्या होत्या त्यांना आता आपली माहिती सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin yojna)अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारचे निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातर जमा करण्यासाठी राज्य सरकारने 31 डिसेंबर पर्यंत ही केवायसी बंधनकारक केली होती लाभार्थी महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी विभाग ,उपक्रम मंडळ ,भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत नियमित कायमस्वरूपी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत नाही तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही या अटी संदर्भात ऑनलाईन पर्याय (Online Option)निवडताना काही प्रकरणात चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा तांत्रिक किंवा मानवी त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा ऑनलाईन ई केवायसी प्रक्रियेमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे .महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी पडताळणी करण्याच्या सूचना याआधी दिले आहेत. आता अधिकृत पोर्टलवर माहिती दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित किंवा बाद होण्याच्या मार्गावर होते .त्यांना आता 31 मार्चपर्यंत आपली माहिती अपडेट करू शकणार आहेत या निर्णयामुळे ग्रामीण भागातील(Rural Area) गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून लाभार्थ्यांमध्ये समाधानी चे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments