दुर्दैवी घटना :विजेचा धक्का लागून ५ वर्षीय बालकाचा दुर्दैव मृत्यू-; तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Suratgaov village

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना :विजेचा धक्का लागून ५ वर्षीय बालकाचा दुर्दैव मृत्यू-; तुळजापूर तालुक्यातील घटना-Tuljapur Suratgaov village

दुर्दैवी घटना :विजेचा धक्का लागून ५ वर्षीय  बालकाचा दुर्दैव मृत्यू-; तुळजापूर तालुक्यातील घटना-


तुळजापूर : विजेचा धक्का लागून पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना तुळजापूर तालुक्यातील सुरत गाव येथे घडली आहे ही घटना दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी घडली. रणवीर लखन इटकर वय (५)असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी या घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील रणवीर लखन इटकर हा घरात खेळत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला यामध्ये त्याला विजेचा जोराचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला .कुटुंबीयांनी तात्काळ त्याला उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती  त्याला मृत झाल्याचे सांगितले  या घटनेमुळे इटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन;या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments