चिवरी पंचायत समिती गणात 63 टक्के मतदान, उद्या फैसला- कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू-
तुळजापूर : जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दिनांक 7 रोजी मतदान पार पडले. यामध्ये तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गण निवडणुकीसाठी ६3 टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले असुन कोण मारणार बाजी याचा फैसला उद्या सोमवारी होणार आहे. याकडे गणातील नागरिकांची लक्ष वेधले आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी दि.०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास उमेदवारांच्या हस्ते मतपेटींचे पुजन करुन मतदानास सुरुवात करण्यात आली. या गणामध्ये एकुण १०,९१० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ५८४६, तसेच स्ञी मतदार ५०६५ इतकी संख्या आहे. यामध्ये आज ३८०९ पुरूष व ३०९९ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला.
चिवरी पंचायत समिती गणात एकुण ६९०८ इतके मतदान झाले आहे. चिवरी पंचायत समिती गणात तिरंगी लढत झाली असून भाजपा महा इती कडून प्रवीण भोसले तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भोसले तर अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी काळजाते हे या मैदानात उतरले होते. यामध्ये दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार हे गंधोरा येथील आहेत तर अपक्ष उमेदवार माजी सैनिक संभाजी काळजाते हे चिवरी येथील असल्याने त्यांना चिवरी मध्ये मतदारांचा कौल जास्त मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यांचा महायुतीच्या उमेदवाराला फटका बसणार की महाविकास आघाडीच्या उमेदवारांला ? अशीही चर्चा होत आहे.
मतदान संपताच गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या कोणत्या गावात किती मतदान झाले, कुठे वाढ घट झाली, याची आकडेमोड सध्या सुरू आहे, निकाला आधीच अंदाजाचे गणित रंगू लागली असून राजकीय धाकधूक कायम आहे.
प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आमचाच उमेदवार विजयी होणार असे जरी प्रत्येक पक्ष सांगत असला तरी उमेवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन याचा फैसला उद्या सोमवार दिनांक 9 रोजी होणार आहे. यामध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मतदान प्रक्रिया पार पडत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

0 Comments