थरारक घटना : तुळजापुरात महिलेचा गळा दाबून निर्गुण खून, पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू-Tuljapur -Murder Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

थरारक घटना : तुळजापुरात महिलेचा गळा दाबून निर्गुण खून, पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू-Tuljapur -Murder Crime News

थरारक घटना : तुळजापुरात महिलेचा गळा दाबून निर्गुण खून, पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू-


धाराशिव : तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील हनुमान नगर परिसरात एका 37 वर्षीय महिलेचा अज्ञाताने  गळा दाबून मिळवून खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक 7 रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे कस्तुरा पवार वय (37) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर शहरातील नळदृग रोडवरील हनुमान नगरात कस्तुरा पवार या एका पत्र्याच्या शेडमध्ये एकट्याच राहत होत्या शनिवारी दिनांक 7 रोजी सकाळी उशिरापर्यंत त्या घराबाहेर न आल्याने नातेवाईकांना संशय आला त्यांनी घरी जाऊन पाहिले असता घराला बाहेरून कडी लावलेली होती कडी उघडून आज प्रवेश करतात कस्तुरा पवार या मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली.

कस्तुरा पवार या मृतदेह रक्ताच्या थरात पडलेला होता आणि त्यांच्या गळ्यावर खुणा स्पष्ट दिसत होत्या यामुळे ही घटना अपघात आहे की घातपाताचा संशय आहे याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी घटनास्थळी दहावी घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे .मात्र हा खून नेमका कोणी आणि कशासाठी कोणत्या कारणासाठी केला हे मात्र पोलीस तपासातून उलगडा होणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या मृत्यू बाबतचे कारण स्पष्ट होणार आहे. यावेळी घटनास्थळी नातेवाईकांनी संतापाचा आक्रोश केला होता. या घटनेचा संपूर्ण तपास तुळजापूर पोलीस करत असून आरोपीच्या तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकातून होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण हनुमान नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments