तुळजापुर: चिवरी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी-
चिवरी/बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती दि, 7 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी प्रारंभी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी बोधाचार्य कैलास गायकवाड यांच्या उपस्थितीत धनराज मिटकरी,जीवन बनसोडे, समाधान चिमणे, सचिन गायकवाड ,बाबूराव मेंढापूरे,जयभीमदादा गायकवाड अजय मिसाळ ,संदेश बनसोडे, चंद्रहार मीटकरी,प्रेम मिटकरी, सागर उबाळे आदींसह तरूण ,जेष्ठ नागरिक, उपस्थित होते.




0 Comments