मौजे बोरामणी येथे हनुमंत पराक्रम वर्णन श्री ब्रह्मपत्र सोहळ्याची ऐतिहासिक सांगता.
""""""""”"""""""""""""""""""""""""""""""""""
१२ तास अखंड रामकथा, ६५ हून अधिक वाचक–सूचकांची सेवा, हजारो रामभक्तांची उपस्थिती.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):-मौजे बोरामणी येथील ऐतिहासिक लाल हनुमान मंदिरात हनुमंत पराक्रम वर्णन श्री ब्रह्मपत्र वाचन–निरूपण सोहळा रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी भक्तीमय व उत्साही वातावरणात दिमाखात पार पडला. न भूतो न भविष्यति असा हा आगळावेगळा धार्मिक सोहळा तब्बल १२ तास अखंड सुरू होता.
श्री संत एकनाथ महाराज लिखित श्री भावार्थ रामायण ग्रंथाच्या सुंदरकांडातील अध्याय २६ ते ३३ या आठ अध्यायांचे १२२८ ओव्यांचे सखोल वाचन व प्रभावी निरूपण रात्रभर करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमास प्रारंभ होऊन सोमवार दि. ९ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता महाआरतीने ब्रह्मपत्र सोहळ्याची सांगता झाली.या सोहळ्यात ६५ हून अधिक वाचक व सूचक रामभक्तांनी सेवा दिली. रामकथा श्रवणासाठी बोरामणी व परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दूर-दूरच्या गावांतून रामभक्तांची गर्दी
दिसून आली.या ब्रह्मपत्र वाचन–निरूपण सेवेसाठी बोरामणीसह इटकळ, चव्हाणवाडी, फुलवाडी, येवती, उमरगा (चि.), दिंडेगाव, कुरनुर, वरळेगाव, दोड्डी, शिरगापुर तसेच परंडा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, कोळेकरवाडी, हिंगणी, खानापूर आदी भागांतून मोठ्या संख्येने रामभक्त, वाचक व सूचक उपस्थित होते.राभक्त ग्रामस्थांने भव्य असे आयोजन केले होते.
हा भव्य आणि प्रेरणादायी धार्मिक सोहळा बोरामणी राम ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध व भक्तिभावाने आयोजित करण्यात आला. संपूर्ण परिसर रामनामात दुमदुमून गेला होता.


0 Comments