तुळजापूर येथील महिलेच्या खून प्रकरणी एक जणांवर गुन्हा दाखल ;किरकोळ भांडणाच्या कारणावरून गळा आवळून केला खून-Tuljapur Crime
धाराशिव: मागील भांडणाच्या कारणावरून एका 40 वर्षीय महिलेचा तिच्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये कशाने तरी गळा वळून खुन केल्याची धक्कादायक घटना दिनांक 7 रोजी तुळजापूर शहरातील नळदृग रोडवरील हनुमान नगर परिसरात उघडकीस आली होती. या प्रकरणी एक जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवत जलद गतीने तपास केला या खून प्रकरणी गब्बर उर्फ वसीम दिलावर पठाण या आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-गब्बर उर्फ वसिम दिलावर पठाण, रा. पापनास नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.02.2026 रोजी 09.00 दि.07.02.2026 रोजी 06.00 वा. सु. मयत नामे- कस्तुरा गणेश पवार, वय 40 वर्षे, रा. हानुमान नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी किरकोळ भांडणाचे कारणावरुन मयत यांचे राहते घरी पत्र्याचे शेडमध्ये कशानेतरी गळा आवळुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तानाजी बापुराव साळुंखे, वय 41 वर्षे, रा. एम.एस. ई. बी. बोर्डाजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 103(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

0 Comments