तरुणाचे अपहरण करून दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी; मुख्य आरोपींसह तीन जणांवर गुन्हा दाखल-
धाराशिव: एका तरुणासह त्याच्या मेव्हण्याचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवत दोन लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी परंडा तालुक्यातील आंबी पोलीस ठाण्यात करमाळा येथील सुरज मारुती जाधव व इतर तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-सुरज मारुती जाधव, रा. करमाळा जि. सोलापूर व इतर तीन अनोळखी इसम यांनी दि.03.02.2026 रोजी 17.00 वा. सु. फिर्यादी नामे-शिवराज जयवंत शिंदे, वय 19 वर्षे, रा. शिरगीरवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांना व त्यांचा मेव्हणा किशोर काळे यांना नमुद आरोपींनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून संगोबा गावी हॉटेल येथे घेवून जावून तु पैशाची व्यवस्था कर व तुजे वडीलांना फोन करुन दोन लाख रुपये मागुन घे असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवराज शिंदे यांनी दि.08.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आंबी येथे भा.न्या.सं.कलम 308(2), 115(2),352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments