दुर्दैवी घटना -ट्रॅक्टर खाली चिरडुन महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार ;लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Accident News Today

Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना -ट्रॅक्टर खाली चिरडुन महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार ;लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Accident News Today

दुर्दैवी घटना -ट्रॅक्टर खाली चिरडुन महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार ;लातूर जिल्ह्यातील घटना-Latur Accident News Today 


लातुर-प्रतिनिधी - ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून दुचाकी वर मागे बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना लातूरच्या साई नाका ते गरुड चौक दरम्यान डी मार्ट जवळ मंगळवार दिनांक 24 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. रस्त्यावर दुचाकी घेताना घसरल्याने मागे बसलेली विद्यार्थिनी थेट ट्रॉलीच्या चाकाखाली आल्याने ही दुर्घटना घडल तेजश्री अशोक पांचाळ वय 21 राहणार पळशी तालुका रेनापुर जिल्हा लातूर असे अपघातात मयत झालेल्या  विद्यार्थिनीचे नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तेजश्री पांचाळ ही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत गेली होती. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यात्रेतून ती आपल्या खोलीकडे जाण्यासाठी मित्राच्या दुचाकी वर बसून बाह्यवळण रस्त्याने रेनापुर नाक्याकडे निघाली होती. यात्रा सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली होती त्याप्रमाणे याच रस्त्याने ऊस वाहतूक करणारे वाहणेही मोठ्या प्रमाणावर अहोरात्र वाहतात.मंगळवारी रात्री तेजश्री मागे बसलेले दुचाकी रस्त्याच्या खालून चालत होती ती रस्त्यावर घेताना साईट पट्टी उंच असल्याने तिची दुचाकी घसरली दुचाकी वरील तिच्यासोबत मित्र व दुचाकी रस्त्याच्या खालच्या बाजूला पडले तर तेजश्री ही रस्त्यावर पडली तेवढ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर जात होता त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागच्या टायर खाली ती आली आणि गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आली.

मंगळवारच्या उत्तररात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रेनापुर नाका ते गरुड चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धेश्वर यात्रेमुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक  कोंडी होत आहे .या रस्त्यावर खडे ही मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे तो केवळ दुपदरी असल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनामुळे सायंकाळनंतर हा रस्ता पूर्णपणे जाम होत आहे .अशातच साईट पट्टी उंच असल्याने रस्त्याच्या खालून दुचाकी रस्त्यावर नेत असताना ती घसरली व तरुण रस्त्यावर पडली ट्रॅक्टर चालक समोर बघून चालवत होता ट्रॉलीला लावून उटी लागल्यासारखे जाणवल्यानंतर अपघात झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या अपघाताच्या घटनेनंतर जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टरचे चालक व किन्नर या दोघांनाही गांधी चौक पोलीस ठाण्यात स्वतःहून होत अपघाताची माहिती दिली .

Post a Comment

0 Comments