मोठी बातमी : जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीपद निवडीचा मुहूर्त ठरला; ग्रामविकास विभागाकडून तारीख घोषित; राजकीय घडामोडींना वेग-Zilha Parishad Member Selection News

Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अध्यक्षपद व सभापतीपद निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण बैठक 20 मार्चपूर्वी घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेल्या या पदासाठीची निवडणूक त्याआधीच पार पडणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता मात्र त्यानंतर अध्यक्ष व सभापतीच्या निवडणुकीच्या तारखेबाबत अनिश्चितता होती .ग्रामविकास विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशामुळे ही प्रतीक्षा संपली आहे संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना 20 मार्चपूर्वी पहिली बैठक आयोजित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आली आहेत.

या आदेशानुसार रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,पुणे ,सोलापूर सातारा ,सांगली ,कोल्हापूर ,छत्रपती संभाजीनगर ,धाराशिव लातूर आणि परभणी या 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची पहिली बैठक होणार आहे. अध्यक्ष व सभापती पदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक स्पष्ट झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीतील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे .ज्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष आहे तिथे बैठका चर्चा आणि जुळवाजुळवीला गती येणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कलम 11 (1) आणि कलम 59 (१) नुसार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो

Post a Comment

0 Comments